राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांनीही प्रतिष्ठेच्या केलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी संध्याकाळी हाती आला. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजप या दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. तर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना कसब्यातील पराभवावरून भाजपाला टोला लगावला आहे. “कालपासून त्यांना घाम फुटलाय. त्यामुळे इतर निवडणुका पुढे ढकलल्या जातील. त्यांची थोडीफार शिल्लक झोपही उडाली आहे”, असं राऊत म्हणाले.
#SanjayRaut | #EknathShinde | #BJP | #Shivsena | #maharashtra | #UddhavThackeray | #ChiefMinister | #HWNewsMarathi